Kil Bil Balak Mandir

सुस्वागतम सन ब्राईट स्कुल किलबिल बालक मंदिर

शाळेची वैशिष्ट्ये
३ ते ६ वयोगयतील विद्यार्थ्यास अंगणवाडी, लहान गट, मोठा गट यात प्रवेश घेता येतो. याच वयात मुलांचा शब्द संग्रह वाढतो. निरिक्षण क्षमता, तसेच आकलन शक्तीस वाव मिळण्यासाठी शाळेत या अनुरूप विविध उपक्रम घेण्यात येतात.

शैक्षणिक उपक्रम
आषाढी वारी ते गुढी पाडवा मराठी महिन्यात येणारे सण व उत्सव शाळेत साजरे केले जातात. राष्ट्रीय सण, महान नेत्यांच्या जयंती साजरी होते.

जीवन व्यवहार
सोलणे, कुटणे या सारखे उपक्रम बटाटा, वाटाणा, शेंगदाणे सोलणे, शेंगदाणे कुटणे, लाडू बनविणे इ.उपक्रम राबविले जातात

क्षेत्रभेट
पूर्वीच्या काळातील बारा बलुतेदारांच्या कामाचा आढावा प्रत्यक्ष भेटीतून विद्यार्थ्यांना दिला जातो. ज्यात लोहार, चांभार, कुंभार, न्हावी, सुतार, भाजीवाले, तसेच परिसरातील अन्य विक्रेत्यांच्या कामाची माहिती विद्यार्थ्यांना दिली जाते.

पर्यावरण शिक्षण
झाड लावा झाडे जगवा. रक्षाबंधन: झांडाना राखी बांधून साजरा केला. पालखी मार्गावर बिजगोळे तयार करून वारकर्यांच्या हस्ते त्याचे रोपण करण्यात आले.

पालक शाळा
3 मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून "फिरसे स्कूल चले हम" हा उपक्रम राबविला यात महिला पालकांना परत एकदा शाळेत येवून शाळेच्या प्रांगणात विविध खेळ खेळण्याची संधी उपलब्ध करू देण्यात आली.

वर्ग रचना
वयोगटा प्रमाणे विद्यार्थ्यांना वर्ग सजावटीत सहभागी करुन घेणे वर्गातील फळा व भिंत सजवणे.

प्रात्यक्षिक प्रयोग
विद्यार्थ्यांचे लेखी, तोंडी अभ्यासा बरोबरच प्रत्यक्षीक अभ्यासातून , प्रयोगातून निरिक्षण क्षमता वाढवणे. विद्यार्थ्याचा शारिरिक, बौध्दीक विकास हाच आमचा ध्यास

भविष्यातील उपक्रम
1) सुशोभित वर्ग खोल्या
2)खेळणी घर
3)बाग
४) डिजिटल क्लासरूम

संपर्क:

सुवर्णा संजय सुर्वे: ९९२२७५४५७१